अमृता फडणवीस यांचा जागतिक शांतीदूत म्हणून सन्मान

अमृता फडणवीस यांचा जागतिक शांतीदूत म्हणून सन्मान

World Peacekeepers Movement चे संस्थापक डॉ. सर ह्यूज (Dr. Sir Hughes) यांच्यां हस्ते अमृता यांना हा सन्मान देण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना नुकतंच जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं. World Peacekeepers Movement चे संस्थापक डॉ. सर ह्यूज (Dr. Sir Hughes) यांच्यां हस्ते अमृता यांना हा सन्मान देण्यात आला. अमृता या मुख्यंत्र्यांच्या पत्नी असल्या तरीही सोशल वर्कर अशी त्यांची स्वतःची वेगळी ओळख देखील आहे.

 

View this post on Instagram

 

‪#At the @terryfoxrunindia @terryfoxfoundation -21st Marathon of Hope, in Mumbai towards aiding cancer awareness & research at Tata Memorial Hospital ! Let’s leave no stone unturned to fight this no 1 killer disease & leave a legacy of Humanity behind us! #worldcancerday #worldcancerday2019 #worldcancerday4feb

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis) on

अमृता फडणवीस मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सक्रिय आहेत. त्या सध्या जलसंधारण उपक्रमांवर काम करत आहेत. सर डॉ. ह्यूज यांनी जागतिक शांतीराजदूत म्हणून अमृता यांचा सत्कार केला आहे. The World Peacekeepers Movement (TWPM) ही एक ऑनलाइन चळवळ आहे. फेसबुकच्या माध्यमातून यात जगभरातील 2 लाखांहून जास्त सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत. ही चळवळ कृतज्ञता, क्षमा, प्रेम, नम्रता, देणे, धैर्य आणि सत्य अशा 7 शांती मूल्यांवर आधारित आहे.

उघडपणे Porn पाहतात ‘हे’ लोक, अभिनेत्री रिचा चढ्ढाचा खळबळजनक दावा

अमृता फडणवीस यांना त्यांच्या सामिजिक कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला. सामाजिक कार्य, मानवतेची सेवा आणि समाजात शांतता राखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न याच्या आधारावर अमृता यांना जागतिक शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्यांना एक फ्रेम, सन्मानपत्र, एक पीस हॅपर आणि चांदीचा नाणे देण्यात आलं.

'ये रे ये रे पैसा 2' या मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्यानं प्रसाद ओक संतापला

अनुष्का शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणतो, आम्ही दोघंही...

=================================================================

शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 01:37 PM IST

ताज्या बातम्या