अमित शहांचं मुंबईत आगमन, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

ठरल्याप्रमाणे भाजपाध्यक्ष अमित शहांचं मुंबईत आगमन झालंय. विमानतळावर त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2018 01:16 PM IST

अमित शहांचं मुंबईत आगमन, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

मुंबई, 06 जून : ठरल्याप्रमाणे भाजपाध्यक्ष अमित शहांचं मुंबईत आगमन झालंय. विमानतळावर त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. विमानतळावरून शहा बांद्रयाच्या रंगशारदा हाॅटेलमध्ये रवाना झाले. तिथे भाजपची बैठक सुरू आहे.

त्यानंतर ते आशिष शेलार यांच्या घरी जातील. काही दिवसांपूर्वी शेलार यांच्या आईंचं निधन झालंय. नंतर ते माधुरी दीक्षितचीही भेट घेणार आहेत.

संध्याकाळी उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीची राजकीय वर्तृळात चर्चा सुरू आहे.

अमित शहा यांचा असा आहे दौरा...

12 वाजता - मुंबई विमानतळ येथे आगमन

Loading...

12:30 वाजता - आशिष शेलार ह्यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.

1 वाजता -  रंगशारदा येथे रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक ह्यांच्याशी चर्चा

3:30 वाजता - अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट

4:30 वाजता - लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट

5:30 वाजता - रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट

7:30 वाजता -  मातोश्री येथे उद्धव ठाकरे ह्यांची भेट

9 वाजता - सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक

10:30 वाजता - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्या सोबत चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...