मुंबई, 23 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकले नाही. त्यामुळे भाजपने टीका केली आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची प्रकृती आता उत्तम आहे. लवकरच ते अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे, आज संध्याकाळी ते संवाद सुद्धा साधणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी दिले आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जयंती आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
सोमवार म्हणजे उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. याची नोंद पालकांनी घेतली पाहिजे. पालकांच्या आग्रहाखातर शाळा सुरू करण्यात आल्या आहे. रिस्क घेऊन मुलांना पाठवू नये. शाळा आणि पालक यांच्यावर पुढची पावलं कशी टाकायची याचा निर्णय आहे. काही जिल्ह्यांनी आणखी १० दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
(विक्रमवीर Sea Rower चा अखेर समुद्रातच मृत्यू, 75 व्या वर्षी घेतलं होतं Challenge)
तसंच, 'एमपीएससी परीक्षाबद्दल माहिती घेतली जाईल. जिथे चूक असेल तिथे न्याय दिला जाईल', असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
'विरोधी पक्षाकडे लक्ष देण्याची गरज नाही. सतत आरोप प्रत्यारोप विरोधी पक्षाकडून सुरू असतात. विरोधी पक्षाचे कामच टीका करण्याचे असते. पण आम्ही आमच्या कामावर लक्ष देऊन आहोत. लोकांची आणि विकासाच्या कामावर आम्ही जास्त लक्ष देतो', असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
(10th Passed Jobs: उमेदवारांनो, ही संधी सोडू नका; Mahatransco चंद्रपूर इथे भरती)
नुकत्याच आलेल्या सर्वेत मुख्यमंत्री टॉप फाइव्हमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा लोकांनी पसंती दिली आहे. जनता आमच्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे आणि लवकरच त्यांना अॅक्शनमोडमध्ये आपण पाहणार आहोत. आज संध्याकाळीच मुख्यमंत्री बोलणार आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.