मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषदेत पार पडला

  • Share this:

मुंबई, 18 मे : कोरोना व्हायरसचे संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. परंतु, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील राजकीय संकटावर पडदा पडला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडीचे पत्र स्वीकाराले आणि सदस्यत्वाची शपथही घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या सभागृहात पोहोचले.  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य निवडीचे पत्र स्वीकारले. त्यानंतर छोटेखानी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी  विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांनीही शपथ घेतली.

विधान परिषदेवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची निवड झाली. तर राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली. तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांचीही निवड झाली आहे.

भाजपकडून यावेळी चार सदस्यांनी शपथ घेतली. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी ज्येष्ठ नेत्यांना तिकीटं डावलण्यात आली होती. त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉक्टर अजित गोपचडे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, ऐनवेळी त्यांनी माघारी घेतली त्यामुळे रमेश कराड यांची निवड झाली. विधान परिषदेच्या सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थितीत होते.

संपादन - सचिन साळवे

First published: May 18, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading