कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गंभीर दखल; घेतला मोठा निर्णय

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गंभीर दखल; घेतला मोठा निर्णय

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आज वर्षा येथे बैठक बोलावण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 5 जानेवारी : पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackray) यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या पंचगंगेवर नियमित देखरेख ठेवणार आहे. याशिवाय दर महिन्याला याचा अहवालही सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आज वर्षा येथे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपास्थित होते. या बैठकीत पंचगंगेतील प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक (mumbai municipal corporation election 2022) पुढील वर्षी होणार आहे. पण, आतापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनंही (Shivsena) आता निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा गुजराती बांधवांना साद घातली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आता मैदानात उतरले आहे. शिवसेनेनं आपल्या पारंपारिक मराठी विभागा व्यतिरिक्त अमराठी बांधवांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील 10 मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेनं गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 5, 2021, 8:15 PM IST

ताज्या बातम्या