मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं, म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॅाटेल मालकांना ठणकावलं, म्हणाले...

आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई, 06 ऑगस्ट : कोरोनाची (corona) लाट ओसरत असल्यामुळे राज्य सरकारने दुकानं खुली ठेवण्यासाठी नियम शिथिल केले आहे. त्यामुळे आता हॉटेल (hotel) आणि बारचालकांनीही (bar) दुकानं 10 पर्यंत सुरू ठेवण्याबद्दल आंदोलनं सुरू केली आहे. पण, 'मला लोकांचा जीव महत्वाचा आहे' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackery) हॅाटेल मालकांना चांगलंच ठणकावलं आहे.

राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन - आहार तसंच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यातल्या हॅाटेल्स आणि रेस्टाँरंटवर लॅाकडाऊनच्या निर्बंधावर या संघटनेनं नाराजी व्यक्त केली होती. दुकानं खुली ठेवण्यास 10 पर्यंत मुदत दिली आहे तर हॉटेल्स व्यवसायाला सुद्धा मुभा द्यावी अशी मागणी या संघटनेनं केली.

Shocking video : त्या दोघांनी पूर्ण ताकद लावली; पण प्रवाशासह दरीत कोसळली कार

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या निर्बंधावर ठाम असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे, त्यामुळे लोकांचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.  आठवड्याभरात परिस्थिती पाहुन निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी हॅाटेल मालकांना दिलं.

राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Airtel चा लाखो ग्राहकांना झटका! पाठवलेल्या एका मेसेजमुळे मागावी लागली माफी

तसंच, 'आपल्याला सर्व गोष्टी पुर्वी प्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरू करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. पुढे तिसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या वाढली, तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सीजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

First published:
top videos