Home /News /mumbai /

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणं

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळ्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे.

    मुंबई, 24 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पॅकेजवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच कोरोनाच्या नव्या लक्षणाची माहितीही दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळ्याच्या काळात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे. 'पुढच्या काही काळात कोरोनाची प्रकरणं वाढणार आहेत. विषाणूच्या संसर्गाचा गुणाकार वाढतो आहे. पावसाळ्यात आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे' अशी चिंता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. 'आतापर्यंत ताप येणे, सर्दी, घसा दुखणे आदी लक्षणं आढळली की कोरोनाची प्राथमिक लक्षणं म्हणून चाचणी केली जात होती. अशी लक्षणं दिसली तरी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. पण सर्दी खोकल्यापेक्षा ताप येणं, थकवा येणं, वास येत नाही, तोंडाची चव जाणं ही नवी लक्षणं आढळून आली  आहेत. अशी लक्षणं जर आढळली तर अंगावर काढू नका. ती कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात' अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. जर 'अशी लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जावे किंवा पालिकेच्या प्रशासनला याची माहिती द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, तेव्हा रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं होतं. या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. परंतु, रक्तसाठा मोठ्या प्रमाणात जमा झाल्यामुळे तो थांबवण्यात आला होता. पण, आता आगामी काळातील परिस्थिती पाहता रक्तदात्याची महाराष्ट्राला गरज आहे. पूरेपूर काळजी घेऊन रक्तदान करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 'राज्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही. कोरोनाशी आपण चांगले लढत आहोत. पण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - मे अखेरीला राज्यात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण दिसतील, असं केंद्राच्या टीमने सांगितलं होतं. तेवढ्या नाहीत तरी आपल्याकडे कोरोनारुग्ण वाढत आहेत. आता अॅक्टिव्ह केसेस 33000 आहेत. - पुढच्या काही काळात कोरोनाची प्रकरणं वाढणार आहेत. विषाणूच्या संसर्गाचा गुणाकार वाढतो आहे. पावसाळ्यात आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. - जरा लक्षणं दिसलं तरी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. - सर्दी खोकल्यापेक्षा ताप येणं, थकवा येणं, वास येत नाही, तोंडाची चव जाणं ही नवी लक्षणं आहेत. ती अंगावर काढू नका. ती कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. - पावसाळ्यात जास्त खबरदारी घेण्याची गरज, बाहेर फिरायला जाऊ नका. - व्हायरस कुणाकडे पोहोचायच्या आत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं - हे आपलं धोरण आहे - 6 ते 7 लाखांपर्यंत मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवलं - राज्याने आतापर्यंत 3 लाख मजूरांना बसने घरी पाठवलं - आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतो, प्रत्यक्षात 40 मिळाल्या - राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन पाठवल्या - राज्याने एसटीसाठी 75 कोटी रुपये दिले संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या