मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेनेच्या खासदाराला 'वर्षा'वर भेट नाहीच! निरोप न आल्याने दीड तास थांबून माघारी

शिवसेनेच्या खासदाराला 'वर्षा'वर भेट नाहीच! निरोप न आल्याने दीड तास थांबून माघारी

भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या ( Varsha Bungalow) शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या.

भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या ( Varsha Bungalow) शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या.

भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या ( Varsha Bungalow) शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यामागे ईडीचा (ed) ससेमिरा अजूनही कायम आहे.  भावना गवळी यांना सुद्धा ईडीने समन्स (ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali)  बजावला आहे. या कारवाईमुळे भावना गवळी यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, भेट होऊ शकली नाही.

भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या ( Varsha Bungalow) शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जवळपास दीड तास त्या वर्षा बंगल्यावर प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. पण, त्यांना भेटीसाठी वेळच देण्यात आला नाही.  एवढंच नाहीतर त्यांना कोणताही निरोप देण्यात आला नाही. त्यामुळे ताटकळलेल्या भावना गवळी यांना पक्षप्रमुखांची भेट न घेतात माघारी परतावे लागले, असं वृत्त दैनिक लोकमतने दिलं आहे.

बापरे! 2 महिने बाटलीत अडकला त्याचा प्रायव्हेट पार्ट; डॉक्टरांनी कापूनच टाकला

भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाली आहे. त्यानंतर भावना गवळींना ईडीकडून समन्स आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे गवळी या भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.

''फोनवर कोणाशी बोलत होती'', पतीनं विचारताच महिलेनं संपवलं आयुष्य

दरम्यान, भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवर ED ने छापेमारी केल्यानंतर, परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ने मंगळवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी EDच्या अधिकाऱ्यांनी भावना गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान (Saeed Khan) यांना अटक केली आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. सईद खान यांना अटक केली असून ते भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

1992 मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला 43 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. 2000 सालापर्यंत हा कारखाना फक्त नावाला उभा होता. सुरू मात्र झाला नव्हता. 2001 मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 2002 मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर 2007 मध्ये राज्य शासनाने बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली. तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी शर्ती लावल्या होत्या.

अरे..! ही तर किरण राव, आमिर खानसोबत घटस्फोटानंतरचे फोटो पाहून अनेकांना ती ओळखेना

यानंतर 2010 मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना भावना गवळी यांचे पीए अशोक गांडोळी यांचे 90 टक्के शेअर असलेल्या भावना ऍग्रो प्रायव्हेट लिमीटेडला विकण्यात आला. यासाठी रिसोड अर्बन क्रेडिट कॉ. बँकची 10 कोटीची बँक गॅरंटी घेत शासनाची परवानगी न घेता विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच व्यवहारात मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप हरीश सारडा यांनी ईडीकडे केला आहे. त्यानंतर ईडीने आज ही कारवाई करत भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचे व्यवहार सांभाळणाऱ्या सईद खान यांना अटक केली आहे.

First published: