मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रीच पोहोचले विधानभवनात!

मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रीच पोहोचले विधानभवनात!

 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ

मुंबई, 17 डिसेंबर : प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) हे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. पण आज रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात (vidhan bhavan) पोहोचले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली. अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  यांनी आज रात्री ८ वाजता विधान भवनात अचानक भेट दिली आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पहाणी केली. त्याच बरोबर त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा सरावही केला.

पहाटे 4 पर्यंत गार्डसोबत गप्पा अन् अचानक स्वदिच्छा गायब, 20 दिवस उलटले पण...

विधान भवनातील विधानसभा आणि विधान परीषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी तिथल्या पूर्व तयारीची पाहणी केली. तसंच विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालय तसंच समिती सभागृहात जाऊन हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची माहिती घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ उडाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Viral : Rashmika Mandanna चा बोल्ड लूक इंटरनेटवर होतोय व्हायरल, पाहा PHOTOS

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी (10 नोव्हेंबर) कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया पार पडली.

First published: