मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पंतप्रधानांनी केली घोषणा, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत अन् थोपाटली आदित्य ठाकरेंची पाठ!

पंतप्रधानांनी केली घोषणा, मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत अन् थोपाटली आदित्य ठाकरेंची पाठ!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याबाबत घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याबाबत घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याबाबत घोषणा केली आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 डिसेंबर : कोरोनाचा नवी व्हेरिएंट ओमायक्रॉनचे  (Omicron ) संकट टाळण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi speech)यांनी 15 वर्षापर्यंत मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे.  कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray ) यांनी स्वागत केलं आहे. तसंच, आदित्य ठाकरेंच्या (aditya thackeray) मागणीचा उल्लेखही केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याबाबत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसंच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती, असंही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितलं.

'याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल, तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तर दुसरीकडे  आमच्या मागणी आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

१६ नोव्हेंबर रोजी मी आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची दिल्लीत भेट घेतली होती.  यावेळी  लहान मुलांचं लसीकरण आणि फ्रंट वॉरियर्सना बूस्टर डोस देण्याची मागणी केली होती.  आज या मागणीला   यश आले आहे, पंतप्रधान मोदींनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे याचे मोठे समाधान आहे.

ओमायक्रॉनच्या संकटामध्ये लहान मुलांना लसीकरणाचा निर्णय घेतला आहे, तो अत्यंत अचूक वेळी घेतला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या लाटेत याचा सर्वांना फायदा होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी राज्यातील आरोग्य विभाग सज्ज झाले आहे, असंही टोपे यांनी आवर्जुन सांगितले.

पंतप्रधानांनी काय केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी १० जानेवारीपासून आरोग्य सेवक आणि डॉक्टर्स यांना बुस्टर डोस घेता येईल, अशी घोषणा केली आहे.

'ओमायक्रॉन जगभरात पसरत आहे. आपले भारतीय संशोधक त्यावर नजर ठेवून आले. आतापर्यंत आपल्याकडे 18 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे १५ वर्षांपासून मुलांना लस घेता येणार आहे. पुढील महिन्यात ३ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. त्याचबरोबर 60 वर्षांवरील किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचा Precaution Dose देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

First published: