Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीस यांच्या 'ठोक सभे'ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका ओळीत दिले उत्तर, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांच्या 'ठोक सभे'ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका ओळीत दिले उत्तर, म्हणाले...

  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता.

    मुंबई, १५ मे - भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर,'त्यांना गुरु शिष्याचे नाते सांगायची गरज नाही' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आनंद दिघे यांच्यावर जीवन प्रवासावर आधारीत 'धर्मवीर आनंद दिघे' हा (dharmavir anand dighe) चित्रपट पाहिला. आयनॉक्समध्ये या चित्रपटाचे खास आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे सोबत होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांनी सभेतून शिवसेनेवर टीका केली, याबद्दल विचारले असता,उद्धव ठाकरे म्हणाले की, 'त्यांना गुरु शिष्याचे नाते सांगायची गरज नाही'अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी देऊन पुढे बोलण्याचं टाळलं. (परभणीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा, 100 पेक्षा जास्त नागरीक रुग्णालयात दाखल) 'आनंद दिघे चित्रपट फार सुंदर आहे, खासकरून अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांचा जो अभिनय केला आहे तो फारच जबरदस्त आहे. मला माहित नाही के प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या ज्या लकबी होत्या, त्या हुबेहुब साकारल्या आहेत. मी जाणून बुजून चित्रपटाचा शेवट नाही पाहिला. तो फारच त्रासदायक आहे, जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वतः बाळासाहेब देखील फार भावुक झाले होते.त्याचे वर्णन नाही करू शकतं', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. (राजस्थानचं प्ले ऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल! दीपक हुडाची एकाकी झुंज अपयशी) पत्रकारांनी पुन्हा मास्क लावण्याची वेळ येईल का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी मास्क घालतो. त्यानंतर त्यांनी वरती हात दाखवत 'बघू आता' असं म्हणतं, तशी वेळ येऊ द्यायची नाही असं आपण करू', अशी सूचक प्रतिक्रिया दिली. किशोरी पेडणेकर यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी होती. मुंबईत राहून हिंदीत भाषणं करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ न शकणारे आज हिंदीत बोलत आहे. अख्य़ा भाषणंही हिंदीत झाली. केंद्रात सरकार असून मराठी भाषेला अभाजित भाषेचा दर्जा देऊ शकले नाही, ते आमच्यावर टीका करत आहे. जे कायम मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करत आले आहे.गेले २५ वर्ष आमच्यासोबत बसले होते आता त्यांची उत्तरपूजा नक्कीच करणार आहे, आता लवकरच उत्तर पूजा सभा होणार आहे, असंही पेडणेकर यांनी सांगितलं. 'उद्धव ठाकरे कधीच लाफ्टर शो करत नाही. कारण आधीच लाफ्टर शो झाले आहे, भोंगे वाजून झाले आहे. हनुमान चालीसा पठण करून झाली आहे. उधवजी कधीच लाफ्टर शो कधीच करत नाही. उद्धव ठाकरे यांची लाफ्टर सभा म्हणे हे कुणी मान्य करणार नाही'असं म्हणत पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यांना टोला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या