• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू झाली आहे.

  • Share this:
मुंबई, 1 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत चर्चा झाली की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एकीकडे, मुख्यमंत्री-राज्यपाल यांची भेट झाली असतानाच दुसरीकडे, महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू झाली आहे. बैठकीत अमेरिकेवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त सामील झाले आहेत. दोन्ही निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात हजर आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवडणूक आयोगानी ही बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात येत आहे. खरंतर, उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. उद्धव ठाकरे-PM मोदींमध्ये झाली होती चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी नुकतीच फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये Coronavirus च्या राज्यातल्या परिस्थितीवर, उपाययोजनांवर चर्चा झालीच, पण त्याबरोबर ठाकरे यांनी राज्यातल्या अनैतिक राजकारणाविषयी मोदींकडे तक्रार केल्याचं समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पंतप्रधानांना सांगितलं. Coronavirus सारख्या संकटाच्या प्रसंगात देखील राज्यात अनैतिक राजकारण सुरू असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. या दोन नेत्यांच्या संभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मुद्दाही चर्चिला गेला. राज्यपालांना मुख्यमंत्रिपदाविषयीच्या पेचासंदर्भात कायदेशीर प्रस्ताव पाठवूनही त्यावर अंमलबजावणी होत नाही, याबाबत उद्धव यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published: