Home /News /mumbai /

विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर अर्ज दाखल

विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर अर्ज दाखल

या निवडणुकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सद्स्य बनणार असल्यामुळे, महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता आता स्थिर राहणार आहे.

    मुंबई, 11 मे : विधान परिषद निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला अर्ज अखेर दाखल केला आहे. तसंच सेनेकडून नीलम गोऱ्हे यांनीही आपला अर्ज सादर केला आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  आज अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलं यावेळी हजर होते. यावेळी सेनेचे नेते एकनाथ शिंदे, संजय राऊत, अनिल देशमुख, मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उपस्थितीत होते. मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. हेही वाचा -राज्याच्या राजकारणाने घेतले नवे वळण,महाविकास आघाडी आणि भाजपसमोर असेल आव्हानं विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी काँग्रेसकडून 2 उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ नये आणि निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. अखेर काँग्रेसने आपल्या दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे.  पण त्या पूर्वीच विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीचे 5 आणि भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करेल. या निवडणुकीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सद्स्य बनणार असल्यामुळे, महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता आता स्थिर राहणार आहे. कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी जाहीर? शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला आहे. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना  उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या नावाची घोषणा खुद्द दिल्लीतून करण्यात आली आहे. भाजपकडून कोण उमेदवार? भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे.  भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Balasaheb thorat, BJP, Congress, Sanjay raut, Shivsena, Uddhav Thackery

    पुढील बातम्या