Home /News /mumbai /

राज्यात लॉकडाउन वाढवणार की उठवणार ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज महत्त्वाची बैठक

राज्यात लॉकडाउन वाढवणार की उठवणार ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज महत्त्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेला संबोधित करणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 5 वाजता महत्त्वाची बैठक आहे.

मुंबई, 12 मे :  महाराष्ट्रापुढे उभं ठाकलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा लवकरच संपणार आहे. पण, त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेला संबोधित करणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 5 वाजता महत्त्वाची बैठक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी 5 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहे. यावेळी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोविड-19 संदर्भात सुरू असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.  तसंच लॉकडाउन संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे. येत्या 17 मे रोजी लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवायचा की नाही, यावर चर्चा सुरू आहे. हेही वाचा -PM आज 8 वाजता करणार जनतेला संबोधित, लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता दरम्यान, 11 मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही मागण्या केल्या होत्या.  उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याची विनंती पंतप्रधानांना केली. तसंच, 'एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असं सांगण्यात येतं की, मेमध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो, असंही बोललं जाते. वुहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे, असं मी वाचलं. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी', असं उद्धव म्हणाले. तसंच, 'मुंबईमध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करावी मात्र, फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी', अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. 'महाराष्ट्रात कोरोना पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे 10 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल', असंही मुख्यमंत्री म्हणाले. हेही वाचा -पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आखला नवा प्लॅन 'राज्याला 35 हजार कोटींचा फटका बसला असून जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिशापोटी संपूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणजे या संकट समयी मदत होऊ शकेल,' अशी मागणीही त्यंनी केली होती. संपादन - सचिन साळवे

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

Tags: NCP, Shivsena, Uddhav Thackery

पुढील बातम्या