मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली हाय व्होल्टेज बैठक, 2 महत्त्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली हाय व्होल्टेज बैठक, 2 महत्त्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा

उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण (Sushant singh rajput) तपास आणि अनलॉकच्या पुढील टप्प्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरक्षेच्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. सुशांतसिंग राजपूतवरही चर्चा होण्याची शक्यता असून थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु होणार आहे. तसंच 5 तारखेपासून राज्यातील काही गोष्टींचे निर्बंध कमी होणार आहेत. येणाऱ्या काळात असणारे सण-उत्सव याबद्दलही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि राज्य सरकारवर आरोप

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. यात राजकारणाला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण दडपण्यासाठी ठाकरे सरकारवर बॉलिवूड आणि माफियांचा दबाव आहे असा आरोप त्यांनी केला. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, 'अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस हे चांगल्या प्रकारे तपास करत आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहे. जर कुणाकडे काही पुरावे असेल तर त्यांनी ते मुंबई पोलिसांकडे सोपवावे, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नये' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 2, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading