अमित शहांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी वापरला 'असंसदीय' शब्द, भाजप नेते भडकले
अमित शहांबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी वापरला 'असंसदीय' शब्द, भाजप नेते भडकले
उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती देताना आक्षेपार्ह शब्द वापरला (CM Uddhav Thackeray Controversial Statement On Amit Shah) आणि भाजप नेते चांगलेच भडकले.
मुंबई, 3 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (State Budget Session) ठाकरे सरकार विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार सामना रंगला. भाजपने विविध मुद्द्यांवर सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषा वापरली. मात्र याच भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती देताना आक्षेपार्ह शब्द वापरला (CM Uddhav Thackeray Controversial Statement On Amit Shah) आणि भाजप नेते चांगलेच भडकले.
'तुम्हाला बाळासाहेबांच्या आठवणीने उमाळे येत आहेत. मात्र याच बाळासाहेबांच्या खोलीत ज्या खोलीला आम्ही मंदिर समजतो, तिथं बंद दरवाजाआड मी आणि अमित शहा यांनी पुढच्या वाटचालीची चर्चा केली, मात्र नंतर निर्लज्जपणे...होय हा शब्द असंसदीय असला तरीही मी वापरतोय...निर्लज्जपणाने आता ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर आल्यावर नाकारली, हे तुमचं हिंदुत्व आहे का,' असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी चांगलाच गोंधळ घातला. सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक होत या शब्दावरून मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
सभागृहात मुख्यमंत्र्यांचं आक्रमक रूप, नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या ठळक मुद्दे :
- राममंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता... पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा आग्रह
- काश्मिरी पंडित निर्वासित होऊन जगत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले
- आमचे हिंदुत्व काढत असताना काश्मीरमध्ये फुटीरतावादांबरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व
- हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही
- माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, आमच्या सगळ्या कामांना कायद्याचा आधार
- राज्यपालांना धन्यवाद त्यांनी नि:पक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली
- ते मराठीत बोलले त्याचा अभिमान, त्यांनी मांडलेल्या मुद्दांवर अनेकांना आक्षेप.
- राज्यपालांनी भाषण मान्य केले पण त्यांच्याच सदस्यांना ते मान्य नाही
- राज्यपाल आपण संस्था मानता त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला
- आपल्या राष्ट्रपतींच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत आठ महिन्यांसाठी 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले मग ते लगेच श्रीमंत झाले का?
- गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते
- आम्ही शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्ये दिली जी अजून सुरु आहे
- भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो.
- सीमाप्रश्नी देवेंद्रजीना मनापासून धन्यवाद. राजकीय जोडे बाजूला ठेऊन राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते. सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्यावतीने धन्यवाद देतो
- कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कशी सक्ती लादते ते मोडून तोडून काढू
- मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले. मराठी भाषा भिकारी आहे का? ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते.
- छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का?
- केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही
- आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले, त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.