गड किल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं पाऊल, सर्वांना केलं आवाहन

'गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे'

'गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे'

  • Share this:
    मुंबई, 14 जून : राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित  पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 250 दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सुचना ऐकल्या. दूर्ग प्रेमीना दूर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सुचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या cmsankalpkaksha@maharashtra.gov.in या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ''राजकारणात पैसाच बोलतो आहे'', काळ्या पैशांवरुन शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल 'दूर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले. गड किल्याचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली  एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागा असंही मुख्यमंत्री म्हणाले. गड किल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गड किल्ल्यांची महती पोहचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडीओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहचेल असे पाहिले पाहिजे. गड किल्यांच्या पायथ्याशी परिसरात त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र व राज्याकडील किल्ल्यांची वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. परिणीती चोप्राचा Vacation Mood On; कोणत्या ठिकाणाची केलीये निवड? यावेळी दूर्गप्रेमींनी आपल्या सूचना मांडतांना दुर्गांचे राज्य सरकारने अधिग्रहण करावे, पर्यटन, पुरातत्व, वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा, दुर्ग संवर्धन खाते सुरु करावे, दुर्गांसाठी सहाय्यता निधी सुरु करावा अशा अनेक सूचना केल्या. तसंच दूर्ग प्रेमी आणि गिर्यारोहक यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 किल्यांचे संवर्धन पहिल्या टप्प्यात करण्याच्या सूचना दिल्या. (1) शिवनेरी - (पुणे जिल्हा)- भारतीय पुरातत्व खाते (2) राजगड- (पुणे जिल्हा) राज्य पुरातत्व खाते (3) तोरणा (पुणे जिल्हा) राज्य पुरातत्व खाते (4) सुधागड - (रायगड जिल्हा) राज्य पुरातत्व खाते (5) सिंधुदुर्ग- (सिंधुदुर्ग जिल्हा) भारतीय पुरातत्व खाते (6) विजयदुर्ग - (सिंधुदुर्ग जिल्हा) भारतीय पुरातत्व खाते
    Published by:sachin Salve
    First published: