Home /News /mumbai /

...म्हणून मुख्यमंत्री ठाकरे अधिवेशनाला येऊ शकले नाही, अजितदादांनी सांगितले कारण

...म्हणून मुख्यमंत्री ठाकरे अधिवेशनाला येऊ शकले नाही, अजितदादांनी सांगितले कारण

हिवाळी अधिवेशनाचे (winter season maharashtra 2021) सूप अखेर वाजले आहे. पण मुख्यमंत्र्यांविनाच अधिवेशन अखेर पार पडले आहे.

हिवाळी अधिवेशनाचे (winter season maharashtra 2021) सूप अखेर वाजले आहे. पण मुख्यमंत्र्यांविनाच अधिवेशन अखेर पार पडले आहे.

हिवाळी अधिवेशनाचे (winter season maharashtra 2021) सूप अखेर वाजले आहे. पण मुख्यमंत्र्यांविनाच अधिवेशन अखेर पार पडले आहे.

    मुंबई, 28 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाचे (winter season maharashtra 2021) सूप अखेर वाजले आहे. पण तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला हजर राहू शकले नाही. मुख्यमंत्र्यांविनाच अधिवेशन अखेर पार पडले आहे. पण, मुख्यमंत्र्यांवर अलीकडे शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आम्हीच त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केली होती, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली आहे. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी अधिवेशनातील कामकाजाचा पाढा वाचला. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयीही माहिती दिली. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. अलीकडेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या मदतीने ते कामाचा आढावा घेत होते. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सुद्धा त्यांनी येऊन चाचपणी केली होती. पण प्रकृती पाहता मुख्यमंत्री 5 दिवस येऊ शकले नाही. आम्हीच विनंती केली की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊ नये, असंही अजितदादा म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे ठरले होते.  नियमात बदल केले होते. तो चांगला निर्णय झाला. लोकशाही मार्गाने राज्यपालला पत्र दिले होते परंतु राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्वभाव मध्ये कडकपणा नाही. त्यामुळे राज्यपालांला कडक पत्र लिहले नाही. 2 महिन्याचा कालावधी आहे. राज्यपालांना भेटू आणि गरज पडल्यास राष्ट्रपतींला भेटू, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं. (IND vs SA : एकाच दिवशी पडल्या 18 विकेट, सेंच्युरियन टेस्ट रोमांचक अवस्थेत) तसंच, 'कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत आहे. यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे. 'तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं. 'शेवटचं बिल आणल्यांनातर फडणवीस आणि मुनगंटीवार बोलले. कुठेही राज्यपालांचं अनादर करणे असं कुठेच होऊ दिलं नाही. हे बिल अजिबात होता कामा नये किंवा फेब्रुवारीमध्ये पुनः एकदा ते चर्चेला आणा असं म्हणाले होते. पण, त्याचे नेते वाटेल ती विधानं करतात. मला राज्य विकायचे असते तर 2 वर्षे कशाला वाट बघितली असती. राज्य विकायला निघालो असं कुणी म्हणालं तर तसं होत नाही, असं म्हणत अजितदादांनी पडळकरांना टोला लगावला. (विधेयक मंजूर केलं तर एवढं का झोंबलं? उदय सामंत यांचा फडणवीसांना सणसणीत टोला) 'शक्ती विधेयक हा ऐतिहासिक विधेयक मंजूर केला आहे. नारी शक्तीला आणखी ताकत मिळणार आहे. तसंच कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घटनेवर सरकारची भूमिका मांडली. ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक घेऊ नये यासाठी विधयेक मंजूर केला आहे. विदर्भामध्ये जास्त निधी खर्च केले आहे. मराठवाडा मध्ये उपलब्ध निधी खर्च केला आहे.  उर्वरित महाराष्ट्र मध्ये 55 टक्के निधी खर्च केला आहे. भीमा कोरोगाव विकसित करण्याचा निर्णय झाला, अशी माहितीही अजितदादांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या