शिवसेनेचा आलेख घसरता,मुख्यमंत्र्यांना चिंता

शिवसेनेचा आलेख घसरता,मुख्यमंत्र्यांना चिंता

भाजपची प्रगती काही शिवसेना नेत्यांनी पहावत नाही, त्यामुळे ते वाद निर्माण करतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • Share this:

25 आॅक्टोबर : शिवसेनेचा आलेख घसरतच चाललाय, अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय.उद्धव ठाकरेंशी माझे उत्तम संबंध आहेत, त्यांच्याशी अनेकदा मी फोनवरून चर्चाही करतो. पण भाजपची प्रगती काही शिवसेना नेत्यांनी पहावत नाही, त्यामुळे ते वाद निर्माण करतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपनं अलिकडच्या काळात अनेक महानगरपालिका आणि नगर परिषदा जिंकल्या. पण शिवसेनेचा आलेख घसरतच चाललाय, असं ते म्हणाले. एका वृत्तपत्रातल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलंय.

मुख्यमंत्री नक्की काय म्हणालेत?

शिवसेनेला आम्ही नेहमी सोबत घेतले आहे. भाजपचा वाढता आलेख शिवसेनेतल्या काही नेत्यांना आवडत नाहीये. त्यामुळे ते आमच्यावर सतत टीका करतात. शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच त्यांना कळत नाही. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा अनेक आव्हानं होती. त्या आव्हानांशी लढा देण्याचा आमचा सतत प्रयत्न सुरू असतो. त्यामुळेच अनेक महानगरपालिका आणि नगर परिषदा आम्ही जिंकल्या. पण शिवसेनेचा आलेख घसरत चाललाय. याचं कारण असं की राज्याची जनता हुशार आहे. कोणत्या पक्षाची वागणूक कशी आहे हे लोकांना माहीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading