...आणि खडसेंनी भाषण केलंच नाही

...आणि खडसेंनी भाषण केलंच नाही

काही सूचना असतील तर त्या सांगा त्याची दखल घेतो पण भाषण करू नका अशी विनंती करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली.

  • Share this:

21 मे : विधानसभेत जयंत पाटलांनी खडसेंना बाहुबली सिनेमातला अमरेंद्रसिंह बाहुबली असा उल्लेख केला आणि  आक्रमक असलेले सत्ताधारी बॅकफूटवर गेले. बाहुबली बोलले तर भूकंप होईल असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे जयंत पाटलांनंतर भाषणाचा नंबर असलेले एकनाथ खडसे काय बोलतात याकडे सगळ्या सभागृहाचं लक्ष लागलं होतं.

खडसे काहीही बोलू नये यासाठी मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. काही सूचना असतील तर त्या सांगा त्याची दखल घेतो पण भाषण करू नका अशी विनंती करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. शेवटी खडसेंनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा मान राखत भाषण केलं नाही. खडसेंनी भाषण न केल्यानं अखेर सत्ताधाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2017 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...