मुंबई-ठाण्यात कोरोनाबाधितांसाठी सरकारचे मोठे पाऊल, उद्धव ठाकरे मोदींना देणार माहिती

मुंबई-ठाण्यात कोरोनाबाधितांसाठी सरकारचे मोठे पाऊल, उद्धव ठाकरे मोदींना देणार माहिती

एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरीक्त 1200 खाटांचे आयसीयु, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले.

  • Share this:

मुंबई, 17 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान  घातले आहे.  राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आणि ठाणे परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांना वेळेवर बेड्स उपलब्ध व्हावे यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई आणि ठाण्यात मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या 1000 खाटांचे कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री  ठाकरे यावेळी म्हणाले की,'बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत. याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे.'

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान मोदींनी चीन वादावर सोडलं मौन

'मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत 1000 खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे.  देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयुची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधानांशी संवाद साधताना देऊ', अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आपण रुग्णालये आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

असे आहे बीकेसीवरील टप्पा 2 रुग्णालय

साधारणता एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरीक्त 1200 खाटांचे आयसीयु, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले. त्याचा आज हस्तातरण सोहळा झाला. हे रुग्णालय आज मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले.  येथे 108  बेडस् आयसीयूचे असून 12 बेडस् डायलेसिससाठी आहेत. तर 406 बेडस् विना ऑक्सिजन आणि 392  बेडस् ऑक्सिजन सुविधायुक्त आहेत.

लहान मुलांकडे लक्ष द्या! आई पाणी भरत असताना 3 वर्षांच्या शिवमने...

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत असून सद्यस्थितीत 500 पेक्षा अधिक रुग्ण सदर हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून दर दिवशी सुमारे 30 रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत.  डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (फेज-२) येथे व्हेंटीलेटर मशिन (30), डायलिसिस मशीन (18), आय. सी. सी. यु. बेल्स (5 फंक्शन मोटराईझड बेड (108), पेशंट वॉर्मर, सिटीस्कॅन मशिन, आर. ओ. सिस्टीम (1250 LPH ), कॉरंटाईन बेड्स, ऑक्सीजन पाईप लाईनचे कनेक्शन, नॉईसलेस सक्शन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ई.सी.जी. मशिन, पल्स ऑक्सीमीटर, कम्प्युटर रॅडिओलॉजी सोल्युशन्स अशा प्रकारचे वैद्यकीय उपकरणे आहेत.

ठाण्यात 24 दिवसांमध्ये रुग्णालयाची उभारणी

अवघ्या 24 दिवसांमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. बाळकुम-साकेत येथे 1024 बेडसचे तळ अधिक 10 मजल्यांचे हे रुग्णालय आहे. आयसीयु बेड, डायलिसीस, प्रयोगशाळा, सीटस्कॅन, एक्सरे आदी सर्व सुविधा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. याकामासाठी एमएमआरडीएसह 19 विकासकांनी योगदान दिले असल्याचे पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading