मुंबई, 30 मार्च : शिवसेना नाव आणि धनुष्यचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. 9 एप्रिलला अयोध्येचा दौरा ठरला आहे. या दौऱ्यादरम्यानच साधू, संत आणि महंतांकडून मुख्यमंत्री शिंदे हे शिवधनुष्य स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. अखेरीस आज रामनवमीच्या दिवशी अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांचे सहकारी मंत्री, शिवसेना आमदार आणि खासदारांचा अयोध्या दौरा आता 9 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहे. साधू, संत आणि महंतांकडून “शिवधनुष्य” स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी राम लल्लाचे दर्शन आणि रात्री शरयू नदी महाआरती होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीनगर मधील घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली. ही घटना दुर्दैवी होती. शांतता राखण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही नेते चिघळावत आहे. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. अशा पद्धतीचे खैरे यांचे वक्तव्य राजकीय असून छोट्या मानसिकतेचे आहे. या क्षणाला तिथे शांतता आहे. ही स्थिती कायम राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न करावे लागेल काही, नेते स्वतःच्या स्वार्थासाठी नेते अशी वक्तव्य करत आहे, अशी टोलाही शिंदेंनी लगावला.
(केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मास्टरस्ट्रोक, सांगितला विजयाचा फॉर्म्युला)
नायायालयानं असं कोणतं ही निरीक्षण दिलं नाही. सरकारने कोणती कारवाई केली हे दाखविल्यावर त्यांनी कमेंट केलं नाही. जनरल स्टेटमेंट त्यांनी करून काय कारवाई करावी असं सांगितलं आहे. जाणीव पूर्वक एखादं वाक्य काढून बोलत आहे. ज्यांना न्यायालय समजत नाही ते असं बोलत आहे, असंही शिंदे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.