Home /News /mumbai /

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी उचललं पाऊल; पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी उचललं पाऊल; पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा

एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा...

    मुंबई, 4 जुलै : विधानसभेच्या आपल्या पहिल्या भाषणातच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आपल्या भाषणात ते म्हणाले की, लेखी कामात वेळ घालवणार नाही तर थेट कार्यवाही करणार. सर्वसामान्यांचा विचार करता त्यांनी जनतेसाठी मोठी घोषणा केली. पेट्रोल-डिझेलवरील  (Petrol Diesel Prices) वाढते दर कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 'आपल्या सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करू आणि बळीराजाच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, चुकीची कामं करणार नाही. कोणावरही आकस बुद्धी ठेवणार नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत कार्यकर्तेच राहणार. या राज्यांचं सर्वांगिन काम करणारं सरकार आपण चालवू. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. आणि राज्याला सुजलाम सुफलाम करू.  आम्हाला कधीही ग ची बाधा होऊ देणार नाही.' -हिरकणी गाव वाचवण्यासाठी 21 कोटींचा निधी देणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव... सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. कंपन्यांनी 6 एप्रिलपासून त्याच्या किमती वाढवलेल्या नाहीत. दरम्यान, क्रूडचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111.2 डॉलर होती, जी गेल्या आठवड्यात प्रति बॅरल 119 डॉलरवर पोहोचली होती. >> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर >> पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीट >> नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Petrol and diesel price

    पुढील बातम्या