Home /News /mumbai /

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचं कौतुक, म्हणाले..

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचं कौतुक, म्हणाले..

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला.

  मुंबई, 5 जुलै : राज्यातील शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता खऱ्या अर्थाने फिल्डवर उतरले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून विशेषत: कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्याच्या काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात त्यांनी माहिती दिली. यावेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचं मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केलं. कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये दोन महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून मुंबईत पावसाचा जोर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पावसाचा आढावा घेतला.

  'आमच्यासोबत 115 आमदार, पण...', मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीसांचं मोठं विधान

  सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : मुख्यमंत्री पाऊस आणि जिल्ह्यातील परिस्थिती संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, की आता पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाला आदेश दिले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी संपर्कात आहेत. दरडप्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी पाठवत आहोत. साडेतीनहजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. राज्य सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एनडीआरफची पथकं सगळीकडे तैनात केली आहेत. मुंबई महापालिकेचं कौतुक : मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलं. पालिकेने योग्य नियोजन केल्याने पाणी साचल्याच्या घटना कमी घडल्या आहेत. नेहमीच्या ठिकाणीही पाणी अद्याप साचलं नाही. मुंबईत पाणी साचतं तिथं पालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आलं आहे.
  दरम्यान, पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Eknath Shinde, Mumbai

  पुढील बातम्या