Home /News /mumbai /

शिंदे सरकारचा आघाडीला मोठा दणका! मुख्यमंत्र्यांनी तातडीचा GR काढून घेतला नवीन निर्णय

शिंदे सरकारचा आघाडीला मोठा दणका! मुख्यमंत्र्यांनी तातडीचा GR काढून घेतला नवीन निर्णय

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मागच्या ठाकरे सरकारला सातत्याने झटके देत आहे. आता असाच एक नवीन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

  मुंबई, 4 जुलै : शिंदे गट आणि भाजपचं युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे सरकारने आता ठाकरे सरकारला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय आणि प्रकल्पास शिंदे सरकार स्थगिती देत आहे. यापूर्वी मेट्रो कार शेड पुन्हा एकदा आरेमध्ये नेण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे आता ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या निधीला स्थिगिती देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेले प्रकल्प आता मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचं दिसत आहे. शिंदे सरकारचा ठाकरे सरकारला मोठा दणका शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आता ठाकरे सरकारचे निर्णयास स्थगिती दिली जात आहे. याअंतर्गत फक्त पुणेच नाही तर सर्व जिल्ह्यातील डीपीडीसी निधी वाटपास स्थगिती देण्यात आली आहे. 1 एप्रिल2022 पासून सर्व डीपीडीसींमार्फत झालेल्या निधी वाटपास स्थगिती दिली आहे. नवे पालकमंत्रीच निधी फेरवाटपाचा निर्णय घेणार आहेत. शिंदे सरकारनं तातडीचा जीआर काढून निधीवाटप थांबवलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी कालच मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती. मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी उचललं पाऊल; पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा आरे कारशेडवरुन राजकारण दररोज उपनगरी लोकल लाईनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रोचे जाळे शहरात उभारण्यात येत आहे. मेट्रो 3 चा मार्ग हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्यानं लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. पण दुर्दैवानं या प्रकल्पाच्या नियोजित कारशेडला गेल्या काही वर्षांपासून विरोधाला सामना करावा लागत आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात या मुद्यावरून आमने-सामने आले होते. आरे कॉलनीमध्ये कारशेड करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेनं सत्तेत राहून विरोध केला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) त्यामध्ये आघाडीवर होते. आता तो निर्णय पुन्हा फिरवण्यात आला आहे.
  एकनाथ शिंदे सरकारनं सर्वप्रथम कारशेडचा निर्णय घेतलाय. या निर्णायावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. सरकारच्या या निर्णयाला आगामी काळात विरोध होण्याची शक्यता आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यातील या लढाईत मेट्रो 3 प्रकल्पाचा खर्च दिवसोंदिवस वाढतोय. त्याचा फटका सामान्य करदाते आणि लोकलच्या गर्दीत जीव मुठीत धरूण बसणारे तसंच रोजच्या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांना बसतोय.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

  पुढील बातम्या