मुंबई, 25 जानेवारी : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा एका प्राचार्याला मारहाण प्रकरणामुळे वादात अडकले आहे. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज झाले असून यावर बोलण्याचं टाळलं.
शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच आहे. संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनाच मारहाण केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी सोड सोड नको ते असं म्हणून बोलण्याचं टाळलं. संतोष बांगर यांच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी एका प्रकारे नाराजीच बोलून दाखवली आहे.
आमदार संतोष बांगर मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/5aScLVkJxY
— News18Lokmat (@News18lokmat) January 25, 2023
तसंच, दिल्लीमध्ये ऊस उद्योगासंदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित पार पडली. राज्यात आपलं सरकार आल्यापासून केंद्रातून मदत मिळत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्राकडून सहकार्य मिळेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
(करुणा शर्मा पुन्हा गोत्यात, धमकी दिल्याप्रकरणी 2 ठिकाणी गुन्हे दाखल)
'महाराष्ट्रात आपली परंपरा राहिली आहे. एखाद्या जागेवर एखाद्या सदस्याचं निधन होतं तेव्हा सगळेजण सहकार्य करतात आणि ती निवडणूक बिनविरोध होते याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं आहे, पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे, असं आवाहनही शिंदेंनी केलं.
(राष्ट्रवादीचा 'गेम', या जागेसाठी महाविकासआघाडी सोडून वंचितला पाठिंबा)
'अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी सहकार क्षेत्राबाबत चर्चा केली. ऊस उत्पादानाबाबत ही बैठक होती. ऊस क्षेत्र हे मोठे आहे, येणााऱ्या अडचणी असतील, ऊस उद्योगाला चालणा देण्यासाठी चर्चा झाली आहे. या बैठकीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे' असं आश्वासनही शिंदेंनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.