PMC बँक धारकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव, पैसे परत करण्याची मागणी

PMC बँक धारकांचा मुख्यमंत्र्यांना घेराव, पैसे परत करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची दखल घेत सगळ्यांना भेटीला बोलावलं आणि त्यांची समजूत काढली.

  • Share this:

अजित मांढरे 11 ऑक्टोंबर : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री ठाण्यात प्रचार सभा घेतली. संजय केळकर यांच्या साठी महापालिका मुख्यालयाच्या जवळ ही प्रचारसभा झाली. त्यावेळी सभेच्या ठिकाणी PMC बँक धारकही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत गोंधळ घातला आणि मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची दखल घेत सगळ्यांना भेटीला बोलावलं आणि त्यांची समजूत काढली. सगळ्या खातेदारांचे पैसे देण्यात येणार आहेत. संबंधीत सर्वांशी चर्चा करून सरकार मार्ग काढेल असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावेळी आंदोलकांशी चर्चा करत त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला.

कशाला हवाय विरोधी पक्ष? राज ठाकरेंनी केला खुलासा!

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनाही घेराव

या आधी मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या संतापाला सामोरं जावं लागलं.सप्टेंबर महिन्यात या बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले. त्यामुळं खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन भाजप कार्यालयात दाखल होताचं पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी एकचं गोंधळ घातला. तिथे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र खातेदारांनी त्यांना न जुमानता जोरदार घोषणाबजी केली. तसेच आपल्या खात्यातील पैस परत करण्याची मागणी अर्थमंत्र्यांकडं केली. बँक खातेदारांच्या या गनिमीकाव्यामुळे भाजप कार्यालयात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

'मावळ प्रमाणेच रोहित पवारांचंही पार्सल जनता परत पाठवणार'

या गोंधळानंतर अर्थमंत्री सीतारमन यांनी पीएमसीच्या खातदारांशी या विषयी चर्चा केली. तसेच या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सांगीतलं. वेळप्रसंगी हिवाळी अधिवेशनात यासाठी विधेयक आणण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलं.सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले.त्यामुळं बँकेला नवी कर्ज देण्यावर मर्यादा आल्या. तसेच ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध आले.

अमित शहांचा काँग्रेस-NCPवर हल्लाबोल, हे आहेत भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

बँक खात्यातून पैसे काढण्यावरही बंधनं आले. त्यामुळं खातेदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आपल्या कष्टाची रक्कम बुडणार तर नाही ना? अशी शंका खातेदारांच्या मनात घर करुन आहे.आता अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्षात खातेदरांना कधी दिलासा मिळणार हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 10:53 PM IST

ताज्या बातम्या