अभिभाषण सुरू असताना मराठी अनुवादक गैरहजर, मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

अभिभाषण सुरू असताना मराठी अनुवादक गैरहजर, मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याप्रकरणी जाहीर माफी मागितली. तर अनुवादकाला पोहोचायला उशीर का झाला, याची चौकशी करू, असं स्पष्टीकरण विनोद तावडेंनी दिलं.

  • Share this:

26 फेब्रुवारी : राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना मराठी अनुवादक गैरहजर होता. यावरून आज दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. शेवटी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याप्रकरणी जाहीर माफी मागितली. तर अनुवादकाला पोहोचायला उशीर का झाला, याची चौकशी करू, असं स्पष्टीकरण विनोद तावडेंनी दिलं.

अभिभाषण सुरू असताना गुजराती अनुवाद उपलब्ध होता, पण मराठी अनुवाद येत नव्हता.हा मराठीचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडेंनी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज वादळी सुरुवात झाली. विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. राज्यपालांच्या भाषणाची प्रत आम्हाला मिळत नाही आणि इअरफोनमधलं मराठी भाषांतरही बंद झालं. असा आरोप विरोधकांनी केला. म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.

First published: February 26, 2018, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading