मुख्यमंत्री आणि अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा

मुख्यमंत्री आणि अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा

टीडीपी एनडीएमधून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची सह्याद्री अतिथीगृहात बंद दरवाजाआड चर्चा झाली

  • Share this:

मुंबई, 16 मार्च : टीडीपी एनडीएमधून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची सह्याद्री अतिथीगृहात बंद दरवाजाआड चर्चा झाली.  सह्याद्री अतिथीगृहात इलेक्ट्रिक बस संदर्भात कार्यक्रमाला अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम संपल्यावर अनंत गीते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं गीते याचं म्हणणं आहे. पक्षाची धोरणं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच जाहीर करतील असं गीते यांनी सांगितलंय.

चंद्राबाबू नायडूंचा तेगुलु देसम पक्ष अखेर एनडीएतून बाहेर पडलाय. या पार्श्वभूमीवर भाजपवर नेहमीच आगपाखड करणारी शिवसेना आता एनडीएतून नेमकी कधी बाहेर पडणार, असाही प्रश्न विचारला जाऊ लागलाय. पण त्याआधीच भाजपने शिवसेनेच्या वाघाला गोंजारणं सुरू केलंय.

बुधवारी विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी निवडणुकीतही सेना-भाजपची युती होणार असल्याची एकतर्फी घोषणा करून टाकलीय. विशेष म्हणजे शिवसेना नेत्यांनी भाजपच्या या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही तरीही भाजपनेते युतीबाबत आशावादी आहेत.

First published: March 16, 2018, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading