मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवाजी पार्क मैदान रिकामं! खेळणाऱ्यांना पोलिसांनी काढलं बाहेर, सकाळपासूनच कारवाईला सुरुवात

शिवाजी पार्क मैदान रिकामं! खेळणाऱ्यांना पोलिसांनी काढलं बाहेर, सकाळपासूनच कारवाईला सुरुवात

दादरमध्ये कोरोना काळात (Coronavirus Pandemic) गर्दी काहीशी कमी झाली आहे. अगदी याठिकाणी येऊन खेळणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. मात्र आता राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे याठिकाणी पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.

मुंबई, 05 एप्रिल: नेहमीच गजबजलेला मुंबईतील परिसर म्हणजे दादर (Dadar, Mumbai). बाजार, शिवाजी पार्क, दादर चौपाटी किंवा जवळच असणारे सिद्धीविनायक मंदिर यामुळे या परिसरात कायम गर्दी असते. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Park) पार्कात विशेष गर्दी असते. मात्र सध्या कोरोना काळात (Coronavirus Pandemic) ही गर्दी कमी होऊ लागली आहे. अगदी याठिकाणी येऊन खेळणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. मात्र आता राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे याठिकाणी पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.

मुंबईतील दादरमध्ये असणारे संपूर्ण शिवाजी पार्क मैदान रिकामं करण्यात आले आहे. पोलिसांनी मैदानात खेळणाऱ्या लोकांना मैदानाच्या बाहेर काढले असून तूर्तास मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही आहे. परंतु मैदानावर खेळणाऱ्यांवर पोलिसांनी निर्बंध घालून मैदानाबाहेर काढले आहे. राज्यात कठोर निर्बंध आज रात्रीपासून लागू होणार आहेत. परंतु सकाळपासूनच शिवाजी पार्क याठिकाणी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे.

(हे वाचा-VIDEO: दारुपार्टी करणाऱ्या 25 तरुण-तरुणींना मुंबईत अटक, कोरोनाचे नियम धाब्यावर)

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात 144 कलम लागू केले जाईल.  सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बगीचा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसादेखील सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते

First published: