Home /News /mumbai /

Breaking news: शिवाजी पार्कातील रोषणाईवरून खडाजंगी, महिन्याच्या 'कलेक्शन'मधून खर्च करण्याचा मनसेचा शिवसेनेला खोचक सल्ला

Breaking news: शिवाजी पार्कातील रोषणाईवरून खडाजंगी, महिन्याच्या 'कलेक्शन'मधून खर्च करण्याचा मनसेचा शिवसेनेला खोचक सल्ला

शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबईतील आणखी एका मुद्द्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Park, Dadar) रोषणाई करण्यावरून सेना मनसेत जुंपणार आहे.

मुंबई, 22 मार्च: शिवसेना आणि मनसेमध्ये मुंबईतील आणखी एका मुद्द्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Park, Dadar) रोषणाई करण्यावरून सेना मनसेत जुंपणार आहे. मनसे दरवर्षी दिवाळीला शिवाजी पार्क इथे रोषणाई करते. पण आता शिवाजी पार्कला कायम स्वरुपी रोषणाई करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackarey) यांच्या आमदार निधीतून सव्वा कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पत्र जिल्हाधिकारी यांना लिहिले आहे. या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता अधिक आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी त्यावर टीका करत फेसबुकवर शेअर केली आहे. या कामासाठी जनतेचा पैसा कशाला खर्च करता. त्यापेक्षा दर महिन्याला येणाऱ्याया 'कलेक्शन'मधून खर्च करा असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये येणाऱ्या लोकांना निखळ आनंद मिळावा यासाठी मनसे के रोषणाई करते. पण शिवसेनेला तेही पोटात दुखतं. मनसेला याचे क्रेडिट मिळू नये म्हणून हे केले जात आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी जनतेचा पैसा वापर ला जाणार आहे, त्यापेक्षा माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी नुकत्याच केलेल्या खुलासा प्रमाणे महिन्याला येणाऱ्या कलेक्शन मधून हा खर्च करावा.' (हे वाचा-Goa Municipal Election 2021 : पणजीमध्ये भाजपची जोरदार आघाडी, काँग्रेस पिछाडीवर) त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, 'ज्याप्रमाणे राक्षसाचा जीव पोटात होता त्याप्रमाणे शिवसेनेचा जीव मुंबईत आहे.' यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये करण्यात येणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प वरून सेना मनसेत जुंपली होती. त्याही वेळी मनसेने हा सगळा खर्च सीएसआर मधून केला होता. आता मात्र मुंबई महापालिका जनतेचा पैसा खर्च करत आहे. त्यापेक्षा तो प्रकल्प आमच्याकडे सोपवा आम्ही सीएसआर मधून करू असं पत्र खुद्द राज ठाकरे यांनी महापालिकेला लिहिले होत. काय आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्रात? मुख्यमंत्र्यांनी या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की- छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर याठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी तसंच अनेक खेळाडू आणि नागरिक धावण्यासाठी मैदानाभोवती असणाऱ्या पाऊलवाटेचा वापर करतात. परंतू याठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने नागरिकांना असुविधा होते. सदर मार्गिकेलगत अतिरिक्त विद्युत दिवे आणि इतर सुशोभिकरण करण्यासाठी माझ्या आमदार निधीतून 1,25,00,000 रुपये निधी मंजूर केला जावा.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, MNS, Mumbai, Sandeep deshpande, Shivsena, Uddhav thackarey

पुढील बातम्या