17 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यातले मुख्य आरोपी छगन भुजबळ यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला. एक आमदार म्हणून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क आपल्याला मिळावा अशी मागणी भुजबळांनी न्यायालयाला केली होती.
त्यानुसार आज त्यांना न्यायालयातून एक तास बाहेर काढून विधानभवनात मतदानासाठी आणण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
भुजबळांप्रमाणेच अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा