• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • छगन भुजबळ आणि कुटुंबाची 100 कोटींची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त; किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळ आणि कुटुंबाची 100 कोटींची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त; किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन भुजबळांची 100 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याचा दावा केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑगस्ट : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची 100 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त (100 Crore Rupees property seized) करण्यात आली आहे. असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. केवळ छगन भुजबळच नाही तर माजी खासदार समीर भुजबळ यांचीही मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे, "ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांची 100 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे." किरीट सोमय्यांनी म्हटलं, आयकर विभागाने प्रोसनोट जाहीर केली आहे. समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही सर्व संपत्ती बेनामी असून कोलकाताच्या कंपनीद्वारे खरेदी केली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात छगन भुजबळांनी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने जी कारवाई केली आहे त्यातील संपत्ती आणि आपला काहीही संबंध नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: