छगन भुजबळांना दणका, 300 कोटींची मालमत्ता जप्त

छगन भुजबळांना दणका, 300 कोटींची मालमत्ता जप्त

"भुजबळ कुटुंबाच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाना (८० कोटी), सांताक्रूझमधील अलिशान घर (११.३० कोटी) याचा समावेश आहे"

  • Share this:

मुंबई, 5 जुलै: आयकर विभागाने  माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांची तब्बल 300 कोटींची बेनामी संपत्ती जप्त केलीय.

भुजबळांनी 48 बनावट कंपन्यांच्या मदतीनं एवढी मोठी बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती. छगन भुजबळ गेल्या 14 मार्चापासून मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागानं छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटीसा बजावल्या आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून भुजबळ कुटुंबियांची नाशिक आणि मुंबईतली मोक्याच्या ठिकाणची संपत्ती आयकर विभागाने जप्त केलीय.

भुजबळ कुटुंबाच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाना (८० कोटी), सांताक्रूझमधील अलिशान घर (११.३० कोटी) याचा समावेश आहे. याशिवाय वांद्रे पश्चिममधील हबिब मनोर आणि फातिमा मनोर या इमारतीही जप्त करण्यात आल्या आहेत. या इमारतींची किंमत सुमारे ४३ कोटी ६१ लाख रुपये आहे.

पनवेलमधील ८७ कोटी रुपयांचा भूखंडही जप्त करण्यात आला आहे. कागदोपत्री या मालमत्तेची किंमत २२३ कोटी असली बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याची सूत्रांची माहिती आहे.

First published: July 5, 2017, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading