News18 Lokmat

तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ घरी दाखल

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट सांताक्रुजच्या निवासस्थानी रवाना झाले आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 10, 2018 11:52 AM IST

तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ घरी दाखल

मुंबई, 10 मे : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर केईएम रूग्णालयातून डीस्चार्ज मिळालाय. रुग्णालयातून सुट्टी मिळताच भुजबळ थेट सांताक्रूझमधील निवासस्थानी रवाना झालेत. आज दिवसभर ते घरीच विश्रांती घेणार आहेत. उद्यापासून ते कार्यकर्त्यांना भेटी देतील.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट सांताक्रूझच्या निवासस्थानी रवाना झाले आहे. तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना 4 मे 2018 रोजी जामीन मंजूर झाला होता. तब्बल दोन वर्ष भुजबळांना तुरुंगात राहावं लागलं. पण या जामीनानंतर स्वादुपिंडाच्या त्रासामुळे छगन भुजबळ हे केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. पण जामीनाचा निकाल आला आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याने भुजबळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयात असताना त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. रुग्णालयातून निघाल्यानंतर ते आता त्यांच्या सांताक्रूझच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. त्यांच्या या बाहेर येण्याने अनेक राजकीय सूत्र हलण्याची शक्यता आहे.

Loading...

दरम्यान, छगन भुजबळ यांची तोफ १० जून रोजी धडाडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या वेळी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोपही होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भुजबळ यांचे पहिल्यांदा जाहीर सभेत सार्वजनिक दर्शन घडणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2018 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...