Home /News /mumbai /

2019 पर्यंत काय केलं? OBC आरक्षणावरून भुजबळांनी पुराव्यासह फडणवीसांची बोलती केली बंद!

2019 पर्यंत काय केलं? OBC आरक्षणावरून भुजबळांनी पुराव्यासह फडणवीसांची बोलती केली बंद!

'फडणवीस साहेब म्हणाले सत्ता आली तीन महिन्यात आरक्षण देतो. आरक्षण महत्वाचं आहे तर सत्ता काय गरजेची.

  मुंबई, 05 जुले : ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्यावरून पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra)  राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. 2017 साली केस सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण 2019 पर्यंत काहीच केलं नाही. 1 ऑगस्ट 2019 ला नीती आयोगाला तुम्हीच पत्र लिहिलं आणि भारत सरकारकडे डेटा मागितला होता, असा खुलासा करत भुजबळांनी एकच खळबळ उडवून दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डेटा उपलब्ध व्हावा यासाठी छगन भुजबळ यांनी ठराव मांडला. यावेळी भुजबळांनी फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या पत्रव्यवहारच सभागृहात वाचून दाखवला. लग्नमंडपातच आईनं नवरदेवाला चपलेनं धुतलं; Video Viral झाल्यानंतर समोर आलं कारण परंतु, भुजबळ यांनी बोलण्यास सुरुवात केली असतान फडणवीस यांनी मध्येच उभं राहून आपलं म्हणणं मांडलं. 'इम्पेरीकल पॉलिटीकल रेफरन्स सर्वोच्य न्यायलायात सादर करावे लागेल तरच ओबीसी राजकीय आरक्षण टिकेल, आता ठराव मांडून काहीच साध्य होणार नाही' असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यावर सभापती भास्कर जाधव यांनी हरकत घेत मंत्री छगन भुजबळ यांना बोलू द्यावे, असं सांगितलं. '2017 साली केस सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण 2019 पर्यंत काहीच केलं नाही. 1 ऑगस्ट 2019 ला नीती आयोगाला तुम्हीच पत्र लिहिलं आणि भारत सरकारकडे डेटा मागितला होता. भारताचे रजिस्टर जनरल यांना ही पत्र लिहून तुम्ही डेटा मागितला होता.  त्यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी पत्र लिहिले होते. हा डेटा मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी ही सोशल जस्टीस विभागाला पत्र लिहिलं होतं. नंतर रामदास आठवले यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता, मग तुम्ही 15 महिने काही केलं नाही असं सरकारवर आरोप करताय, मग 2019 पर्यंत काय केलं, डेटा मागण्यासाठी पत्र का लिहिले, असा थेट सवाल भुजबळांनी केला.

  भारीच ना राव! पुणे पोलिसांचं ते ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  मुस्लीम आरक्षण संदर्भात भाजपा विरोध केला. मुस्लीम समाजाला शिक्षणासाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, त्यालाही तुम्हीही विरोध केला, असा आरोपही भुजबळांनी केला. 'एवढी वर्ष तुम्ही जनगणना का नाही केली. सात वर्षे झालं तुमच्या सरकारला चुका सांगत आहोत. मग दुरुस्ती का केली नाही. तुम्ही पाच वर्षात काय केलं. तुम्ही प्रयत्न केला, कोर्टाला सांगितलं, तुमचे प्रयत्न कमी पडतात म्हणून आम्ही सभागृहाला सांगत आहोत, पंतप्रधान मोदींना सांगत आहोत की डेटा आम्हाला द्या, असंही भुजबळ म्हणाले. 'फडणवीस साहेब म्हणाले सत्ता आली तीन महिन्यात आरक्षण देतो. आरक्षण महत्वाचं आहे तर सत्ता काय गरजेची. तुम्ही पंतप्रधानांकडे डेटा मागा, श्रेय तुमचे चला. पण तुम्ही शब्द छळ करता. चुका झाल्या तर दुरुस्त करायला पाहिजे होत आता सांगता तपासात आहोत. मग सहा सात वर्षे काय केलं? असा सणसणीत टोला भुजबळांनी फडणवीसांना लगावला.

  शेतातून घरी परतणाऱ्या विवाहितेचं अपहरण; निर्मनुष्य ठिकाणी नेऊन घृणास्पद कृत्य

  भुजबळांनी जोरदार बॅटिंग करत ठराव मांडला. त्यानंतर फडणवीस बोलायला उभे राहिले असता बोलू न दिल्यामुळे भाजप आमदारांनी एकच गोंधळ घातला. अखेर या गोंधळातच विधान परिषदेत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण ठराव मांडू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. छगन भुजबळ यांनी ठराव मांडला त्यावर, अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्याने फडणवीस यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. भाजपा आमदार सभागृहात गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भास्कर जाधव दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे  काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या