छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. छगन भुजबळांसोबत पंकज भुजबळही होते.

  • Share this:

मुंबई, 11 मे : जमीन मिळून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. छगन भुजबळांसोबत पंकज भुजबळही होते.

कालच केईएममधून भुजबळांना डिस्चार्ज मिळाला. जामीन मिळाल्यावर भुजबळांनी पवारांचे  आभार मानले होते. या भेटीत भुजबळांच्या प्रकृती संदर्भात चर्चा झाली, पवार यांनी विशेष काळजी घ्या असं सांगितल्याचं कळलं. पवारांनी वडिलकीच्या नात्याने विचारपूस केली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं कळतंय.

First published: May 11, 2018, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading