News18 Lokmat

महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन जिसने बनाया वो अंदर; भुजबळांची खंत

मी अडीच वर्ष जेलमध्ये काढले पण मलाच माहित नाही की मी जेलमध्ये का होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2018 05:54 PM IST

महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन जिसने बनाया वो अंदर; भुजबळांची खंत

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 16 डिसेंबर : मी अडीच वर्ष जेलमध्ये काढले पण मलाच माहित नाही की मी जेलमध्ये का होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. "महाराष्ट्र सदन बहुत सुंदर, लेकिन जिसने बनाया वो अंदर" अशी खंतदेखील छगन भुजबळ यांनी व्यक्त करून दाखवली.

ठाण्यात आयोजित माळी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप माझ्यावर केला गेला. पण मी अतिशय भव्य आणि आलीशान महाराष्ट्र सदन बनवलं. या सदनात संपुर्ण महाराष्ट्राचा इतिहास आहे. नरेंद्र मोदींपासून ते राहुल गांधीपर्यंत सगळी मंडळी या सदनात सभा घेतात. अमित शहा तर त्या सदनात राहतात. पण कोणीही या सदनाकरता पैसे दिले नाहीत अशी टीकाही छनग भुजबळ यांनी केली आहे.

तर दाभोळकर पानसरे प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी की नाही याबाबत हे सरकार गंभीर नसल्याचंही भुजबळ म्हणाले. एक तर आरोपी सापडत नव्हते आणि आता सापडलेत तर आरोपी पत्र दाखल केलं गेलं नाही अशी टीका करत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

आम्ही पण गृह खातं सांभाळलं आहे. एखाद्यावर कारवाई करणं हा पोलीसांचा प्रश्न नाही पण या लोकांना शिक्षा व्हावी ही शासनाची इच्छा आहे की नाही हे आता स्पष्ट झालंय. हे सरकारचं अपयश आहे. जेलमध्ये कोणाला ठेवायचे कोणाला नाही हे सरकार ठरवतं. सीबीआयचे मोठे मोठे अधिकारी एकमेकांवर आरोप करत आहेत, धाडी टाकतायेत. त्यामुळे सरकारचा सावळा गोंधळ असल्याचं भुजबळ म्हणाले.

Loading...

आता लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदीजींचं स्वागत आहे. आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, आता काही परिणाम होणार नाही कारण लोकांनी आता मन बनवलं आहे. कारण ५ राज्यातील निकाल पुढेही कायम राहतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

माळी समाजाबाबत काय म्हणाले भुजबळ?

आपण फक्त माळी समाजाच्या लोकांसोबत पुढे जाऊ शकत नाही. सर्व समाजाच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. कोणी अधिकारी असो किंवा कोणत्याही पक्षाचा नेता असो फक्त आवाज दिला तर सर्व माळी समाजाने एकत्र यावे असं आवाहन यावेळी छगन भुजबळ यांनी माळी समाजातील बांधवांना केलं.

आरक्षण मिळेत असेल तर सगळे पहिले रांगेत उभे राहतील, पण संघर्ष करायला कोणी येत नाही. काही जण तर माळी असल्याचं दाखवत नाहीत याचं दु:ख असल्याचंही ते म्हणाले.

जो उठतो तो माळी संघटना काढतो, पक्ष काढतो.  निवडणूकीला उभा राहतो आणि डिपॉझिट पण वाचत नाही. त्यामुळे लोकांच्या हास्याचा विषय बनू नका. माळी समाजाने वेगवेगळे चालण्यापेक्षा एकत्रित चाललो पाहिजे असा सल्ला यावेळी भुजबळ यांनी माळी समाजाला दिला.


VIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2018 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...