राष्ट्रवादीचे 'बाहुबली' नेते शिवसेनेच्या वाटेवर; गणपती आगमनाआधीच करणार सहकुटुंब प्रवेश!

राष्ट्रवादीचे 'बाहुबली' नेते शिवसेनेच्या वाटेवर; गणपती आगमनाआधीच करणार सहकुटुंब प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बाहुबली नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बाहुबली नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या चर्चेवर खुद्द भुजबळांनी देखील मी राष्ट्रवादीतच असल्याचे म्हटले होते. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणपती आगमनाआधीच भुजबळ कुटुंबीय शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतील पुनर्वसनाची समीकरणही भुजबळांनी सोडवल्याचे समजते.

भुजबळांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात अधिकृतपणे अद्याप काहीच सांगितले नसले तरी गेल्या काही दिवसातील पडद्यामागील घडामोडी पाहता त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होईल. भुजबळांच्या या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अनेक आमदार शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर अनेक मतदारसंघातील विधानसभेचे संभाव्य उमेदवार देखील सत्तधारी पक्षात जात आहेत. भुजबळांच्या प्रवेशाने आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलासुरला बुरूजही ढासळणार असे दिसत आहे.

गणपती आगमनाआधीच कमबॅक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2-3 दिवसात भुजबळ शिवसेनेत प्रवेश करतील. याचा अर्थ गणपती आगमनाआधीच भुजबळांचे शिवसेनेत कमबँक होईल. आजच दुपारी राष्ट्रवादीचे आमदार अवधुत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी पक्षांकडे इनकमिंग जोरदार सुरू आहे.

'भुजबळांच्या चर्चेवर विश्वास नाही'

तर खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत माझा विश्वास नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पक्षात पडझड सुरू आहे हे मान्य आहे. संघर्ष करून अडचणीच्या काळावर मात करणार आहोत. या पक्षातून त्या पक्षात जाणं हे काही सिरीयस राजकारण नाही. राष्ट्रवादीत असलेले, आलेले सगळे फक्त सत्तेसाठी नाहीत. राज्यातील समस्यांची ग्राउंड रिऍलिटी जाणून घेण्यासाठी दौरा असल्याचंही त्या म्हणाल्या.

SPECIAL REPORT : 'तुम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसायला निघाला'

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2019, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading