शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पहिल्यांदाच काय बोलले छगन भुजबळ?

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पहिल्यांदाच काय बोलले छगन भुजबळ?

'भुजबळ म्हणाले, पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि माझ्या सूना सगळेच सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेत आहेत.'

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 26 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाण्याची जोरदार चर्चा आहे. गेले काही वर्ष भुजबळ हे राष्ट्रवादीत नाराज असून त्यांना डावलण्यात येत असल्याची त्यांची भावना आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा नाशिकमध्ये आली असतानाही छगन भुजबळांनी त्याला दांडी मारली. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याचा कुणालाच थागपत्ता लागत नव्हता. या सगळ्या राजकीय चर्चेवर छगन यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखीच बुचकळ्यात टाकणारी आहे. तुमच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असा थेट प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले मै यही हु, मै यही हु, मै यही हु. पण शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचं खंडन मात्र त्यांनी केलं नाही.

उपमुख्यमंत्रीपद घेणार का? आदित्य ठाकरेंच्या उत्तराने सस्पेन्स कायम!

भुजबळ म्हणाले, पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि माझ्या सूना सगळेच सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेत आहेत. भुजबळांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सुरू असलेल्या कोर्ट कचेऱ्या आणि पक्षात होत असलेली उपेक्षा या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत येणार अशी चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे नेते चिंतेत आहेत. तर नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मात्र अशी शक्यता नसल्याचं संकेत दिलेत. भुजबळांनी बाळासाहेबांना आणि शिवसैनिकांना दिलेला त्रास जनता विसरलेल नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

भाजमध्ये इनकमिंगचा महापूर! 17 आमदार लाईनमध्ये, विरोधकांच्या पोटात गोळा

'भुजबळांच्या चर्चेवर विश्वास नाही'

तर खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत माझा विश्वास नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पक्षात पडझड सुरू आहे हे मान्य आहे. संघर्ष करून अडचणीच्या काळावर मात करणार आहोत. या पक्षातून त्या पक्षात जाणं  हे काही सिरीयस राजकारण नाही. राष्ट्रवादीत असलेले, आलेले सगळे फक्त सत्तेसाठी नाहीत. राज्यातील समस्यांची ग्राउंड रिऍलिटी जाणून घेण्यासाठी  दौरा असल्याचंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 05:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading