जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंटचे दमानियांचे आरोप खोटे,भुजबळांचं जेलमधून पत्र

मला व्हिआयपी ट्रीटमेंट असं सांगून मला बदनाम करण्याचा आणि जामीन मिळू न देण्यासाठी प्रयत्न होतो आहे, माझ्या जीवावरच काही विरोधक उठले आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 17, 2017 09:33 PM IST

जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंटचे दमानियांचे आरोप खोटे,भुजबळांचं जेलमधून पत्र

17 मे :  आम्हाला तुरुंगात नारळातून दारू दिली जात नाही. हे सगळे आरोप धांदाट खोटे आहे. मला व्हिआयपी ट्रीटमेंट असं सांगून मला बदनाम करण्याचा आणि जामीन मिळू न देण्यासाठी प्रयत्न होतो आहे, माझ्या जीवावरच काही विरोधक उठले आहेत. असा दावा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. तसंच अंजली दमानिया यांनी यासाठी कंत्राटच घेतलं अशी टीकाही भुजबळांनी केलीये.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना आॅर्थर रोड तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा खळबळजनक आरोप केला होता. एवढंच नाहीतर भुजबळांना नाॅनव्हेज जेवण आणि नारळातून व्होडका सारखी दारू दिली जाते असा आरोपही केला होता. आज छगन भुजबळ यांनी जेलमधून पत्र लिहुन दमानियांचे आरोप फेटाळून लावले.

दमानियांनी माझ्यावर लावलेले सगळे आरोप धादांत खोटे आहे. मला घरचे जेवण न्यायालयाच्या परवानगीनंच दिले जाते आणि व्होडका सारखी दारू पोहोचवली जाते हे धादांत खोट असल्याचंही भुजबळांनी म्हटलं आहे.

तसंच जेलमध्ये मला जर काही भेटत असेल तर जेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व काही कैद होईल. मुळात सगळे आरोप धादांत खोटे आहे. अंजली दमानिया यांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी कंत्राट उचललंय असा प्रतिआरोपही भुजबळांनी केला. तसंच वकिलांशी कायदेशीर सल्ला घेऊन दमानियांच्या विरोधात कारवाई करणार असा इशाराही भुजबळांनी दिला.

भुजबळांचं जेलमधून पत्र

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...