'सामना'च्या अग्रलेखातून चक्क भुजबळांचे कौतुक, राजकीय चर्चेला उधाण

'सामना'च्या अग्रलेखातून चक्क भुजबळांचे कौतुक, राजकीय चर्चेला उधाण

शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज चक्क भुजबळांचं कौतुक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सदनचा घोटाळा झालाच नव्हता, असा दावाही या अग्रलेखातून करण्यात आलाय.

  • Share this:

08 मे : शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज चक्क भुजबळांचं कौतुक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सदनचा घोटाळा झालाच नव्हता, असा दावाही या अग्रलेखातून करण्यात आलाय. तसंच जामिनावर सुटलेले भुजबळ नवा मेकअप करून कोणत्या मंचावर उतरतात, याबाबतही उत्कंठावर्धक प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

आम्ही वैयक्तिक वैर ठेवत नसल्याची भूमिकाही या अग्रलेखातून मांडण्यात आलीय. उत्तर महाराष्ट्रात भुजबळांचा दबदबा असलेल्या भागात आणि राज्यातल्या माळी आणि ओबीसी समाजात भुजबळांवर शरद पवार यांनीच अन्याय केल्याची चर्चा आहे. त्याचं वेळेस भुजबळांच्या जामीनावर झालेल्या सुटकेनंतर सामना च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा शिवसेनेने भुजबळांना चुचकरण्याचा प्रयत्न केलाय.

त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आताचे ओबीसी लीडर भुजबळ शिवसेनेला खरंच त्यांच्या पक्षात हवेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

सामना अग्रलेख

भुजबळ काय करतील?

भुजबळ नवा 'मेकअप' करून कोणत्या मंचावर जातात? ती उमेद त्यांच्यात उरली आहे काय? या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील. भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त 'सामना'नेच छापले. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे! आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल.

 

First Published: May 8, 2018 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading