कतरिना- अनुष्काला बाईक शिकवण्या चेतना पंडितने केली आत्महत्या

कतरिना- अनुष्काला बाईक शिकवण्या चेतना पंडितने केली आत्महत्या

राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्या 27 वर्षांच्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 12 जुलैः बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना बाईक चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या चेतना पंडित यांनी सोमवारी गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्या 27 वर्षांच्या होत्या. पोलिसांना एक सुसाइड नोटही मिळाली. त्यांच्या मृत्यूला कोणीही कारणीभूत नसल्याचे त्यांनी या नोटमध्ये लिहिले आहे. प्रियकरासोबत झालेल्या प्रेमभंगातून चेतनाने हे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे.

सुसाइड नोटमध्ये चेतना यांनी लिहिले की, 'काही महिन्यांपूर्वी माझे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर मी फार एकटी पडली. करिअरमध्येही मी लक्ष देऊ शकत नव्हते.' तिला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला होता, असे तिच्या मैत्रिणीने सांगितले. चेतना गोरेगावमधील पद्मावतीनगर अपार्टमेन्टमध्ये आपल्या चार मैत्रिणींसोबत राहत होती. सोमवारी रात्री घरात कोणीही नसताना त्यांनी गळफास लावून घेतला.

चेतना यांच्या मैत्रिणी घरी पतल्यावर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडत नसल्यामुळे चावीवाल्याच्या मदतीने त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यांना चेतना यांचा निस्तेज मृतदेह दिसला. चेतना लहान असतानाच त्यांच्या आई- वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांना एक सख्खा लहान भाऊ असून सुसाइड नोटमध्ये चेतना यांनी भावाची माफी मागितली आहे. सध्या भाऊ काकूसोबत राहत आहे. चेतना पंडित यांनी कतरिना कैफला धुम- 3 मध्ये अनुष्का शर्माला जब तक है जानमध्ये तर श्रद्धा कपूरला विलन सिनेमासाठी बाईक चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते.

हेही वाचाः

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

पाकने केला पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याचा अपमान, पगडी हिसकावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 05:35 PM IST

ताज्या बातम्या