औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात विक्रेत्यांचा देशव्यापी संप

Samruddha Bhambure | Updated On: May 30, 2017 09:34 AM IST

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात विक्रेत्यांचा देशव्यापी संप

30 मे : ऑनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढवावं आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथील करावेत, या मागण्यांसाठी आज (मंगळवार)देशभरातील सर्व औषध विक्रेत्यांनी  संप पुकारला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने हा निर्णय घेतला आहे.

देशभरातील नऊ लाख औषध विक्रेते या संस्थेचे संघटनेचे आहेत. आमच्या तक्रारी आम्ही अनेकदा सरकारकडे मांडल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आम्ही बंदचा निर्णय घेतल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

ई-फार्मसीसाठी औषध विक्रेत्याला सरकारदरबारी नोंदणी करावी लागणार असून औषधांच्या किंमतीची एक टक्का रक्कम सरकारला जाणार आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसेल तसंच झोपेच्या गोळ्या, ड्रग्ज आणि गर्भपाताची औषधंही सगळ्यांना सहज उपलब्ध होण्याचा धोका आहे. यामुळे देशातल्या आठ लाख औषध विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे सरकारनं ई फार्मसीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2017 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close