News18 Lokmat

आंबा घेताय? सावधान...पिकण्यासाठी होतोय केमिकल्सचा वापर

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते आहे. पण याच पिवळ्या धम्मक आंब्यांमध्ये काही घातक केमिकलचा सरास वापर होतोय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 09:06 PM IST

आंबा घेताय? सावधान...पिकण्यासाठी होतोय केमिकल्सचा वापर

13 एप्रिल : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होते आहे. पण याच पिवळ्या धम्मक आंब्यांमध्ये काही घातक केमिकलचा सरास वापर होतोय. हे केमिकल तब्येतीसाठी हानिकारक आहे.

बाजारात पाहायला मिळतायेत हे रसरशीत आंबे.पण आता पाहूया यामागचं भीषण वास्तव.आंब्याचा रंग बदलण्यासाठी, आंबा लवकर पिकावा यासाठी केमिकल्सचा वापर केला जातोय. बाटलीतून इंजेक्शनमध्ये भरुन एथिलीन रसायन आंब्यांमध्ये टाकलं जातं. या रसायनामुळे ४८ तासांच्या आत आंबे पिकतात.

गोदामातले मजूर सलग या आंब्यांमध्ये हे रसायन टाकत असतात. हे रसायन टाकल्यावर आंबे धुतले जातात, आणि काही वेळ आंबे तसेच ठेवून त्यांना भरलं जातं, आंबे भरताना पेटीमध्येही कार्बाईनचे तुकडे टाकले जातात. जेणेकरुन आंबे वेगानं पिकतील.यामुळे आंब्याची मूळ चव तर जातेच पण अनेक आजारांनाही आमंत्रण मिळतं.

कॅल्शियम कार्बाईड, एसिटिलीन, एथिलीन, प्रॉपलीन, इथरिल, ग्लाइकॉल आणि इथेनॉल ही रसायनं आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरली जातात.आर्सेनिक आणि फॉस्फरसमुळे स्वास्थ्याला हानिकारक आहेत. रसायन टाकलंय ते आंबे आणि रसायन न टाकलेले आंबे यामधला फरकही कळणार नाही इतक्या बेमालूमपणे हे काम केलं जातं.

या केमिकल्सचा होतो वापर

Loading...

कॅल्शियम कार्बाइड

एसिटिलीन

एथिलीन

प्रॉपलीन

इथरिल

ग्लाइकॉल

इथेनॉल

रसायनांमधील आर्सेनिक आणि फॉस्फरस तब्बेतीसाठी हानिकारक

केमिकलचे परिणाम

पोट खराब

आतड्यांचे गंभीर आजार

पेप्टिक अल्सर

मज्जासंस्थेसाठी घातक - डोकेदुखी, चक्कर येणं, विस्मरण, झोपण्यातल्या अडचणी असे अनेक आजार

गर्भवती महिलांना होणाऱ्या बाळाला आजार होऊ शकतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...