मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Chembur Wall Collapsed : चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य संपले, 21 जणांचा मृत्यू, 2 जण बचावले

Chembur Wall Collapsed : चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य संपले, 21 जणांचा मृत्यू, 2 जण बचावले

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच घरांवर कोसळली.

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच घरांवर कोसळली.

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच घरांवर कोसळली.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 18 जुलै : मुंबईत पावसाने रविवारी अक्षरश: थैमान घातलंय. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी दुर्घटना ही चेंबूरमध्ये घडली. चेंबूर मध्ये आता रेस्क्यू ॲापरेशन पूर्णत संपलेलं आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर 2 जणांवर उपचार सुरू आहे.

NDRF ने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर बचावकार्य (Rescue operation is underway) सुरू होतं. आता संध्याकाळी ते संपले आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता 2 जणांना राजावाडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे मदतकार्य आणि रेस्क्यू ॲापरेशन करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेर ॲापरेशन आता संपलेल आहे, अशी माहिती आशिष कुमार यांनी दिली.  तसंच, घटनास्थळी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे काही जणांना स्थलांतरीत केले आहे.

काय घडलं नेमकं?

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच घरांवर कोसळली. सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला होता.

VIDEO : रेल्वेखाली करीत होता दुरुस्ती, हॉर्न वाजला..आणि अचानक सुरू झाली ट्रेन

संध्याकाळपर्यंत हा आकडा 21 वर पोहोचला. एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली

दरम्यान, विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील (Vikhroli) पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. (ground-plus-one residential building collapsed) यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published: