चेंबूरमध्ये शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

बीएमसीमधील नगरसेवक फोडाफोडीवरून सेना-मनसे भाजप आमनेसामने आले असतानाच तिकडे चेंबूरमध्येही सेना-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. चेंबूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत जोरादार हाणामारी झालीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2017 05:12 PM IST

चेंबूरमध्ये शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

मुंबई, 15 ऑक्टोबर : बीएमसीमधील नगरसेवक फोडाफोडीवरून सेना-मनसे भाजप आमनेसामने आले असतानाच तिकडे चेंबूरमध्येही सेना-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. चेंबूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत जोरादार हाणामारी झालीय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्कीही झाली.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयावर महागाई आणि नोटबंदीविरोधात मोर्चा काढला होता, त्यावरून शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय. या राजकीय राड्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. आता तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...