मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

चेंबूरमध्ये घरावर दरड कोसळल्यानं 11 जणांचा मृत्यू, NDRF चं बचावकार्य सुरु

चेंबूरमध्ये घरावर दरड कोसळल्यानं 11 जणांचा मृत्यू, NDRF चं बचावकार्य सुरु

Chembur Bharat Nagar area wall collapse:   चेंबूरमध्ये (Chembur Bharat Nagar area) एक दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 18 जुलै: मुंबईला (Mumbai)पावसानं झोडपून काढलं आहे. सर्व रस्ते जलमय (Mumbai Rain) झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचले आहे. यातच चेंबूरमध्ये (Chembur Bharat Nagar area) एक दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. घरावर संरक्षक भिंत (wall collapse) कोसळल्याची माहिती मिळतेय.

मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर (Chembur Bharat Nagar area) परिसरामध्ये दरड कोसळली. यात 11 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफचं (National Disaster Response Force ) पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. (Rescue operation is underway)

मुंबई, ठाणे, (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यातआज 24 तासात काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील तीन तासात पालघर, ठाणे, रायगड, मुंबई आणि उपनगरसह जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

धो-धो पावसामुळे मुंबई जलमय, आज मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने थैमान घातलं आहे. शनिवारपासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. रात्रभर मुसळधार पाऊस सुरुच आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai rain