दिवाकर सिंग, प्रतिनिधीमुंबई, 26 मे : मुंबईतील (Mumbai) वर्सोवा भागात दुधामध्ये भेसळ ( milk) करण्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने (Mumbai Crime branch) छापा टाकून तब्बल 294 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध दूध कंपन्याच्या दुधाच्या बॅगमधून दूध काढून त्यात पाणी मिक्स केले जात होते. त्यानंतर दुधाची बॅग मेणबत्ती आणि स्टोव्हच्या मदतीने सिल बंद केले जात होते. त्यामुळे मुख्य दुधाची बॅग ओळखता सुद्धा येत नव्हती. यामध्ये अमुल आणि गोकुळच्या दुधाचा बॅगचा समावेश होता. दुधाच्या बॅगेतून दूध काढून रिकाम्या बॅगेमध्ये पाणी आणि दूध मिक्स करण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता.
महिलांबाबत ते वाक्य जेठालाल यांना पडलं होतं भारी; झाली होती अटकेची मागणी
मुंबई क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा भागात दुधाची भेसळ केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. प्रसिद्ध दूध कंपन्याच्या बॅग फोडून त्यात पाणी मिक्स केले जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रांचने एक टीम तयार केली आणि घटनास्थळावर छापा मारला.
या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींकडून दूध भेसळ करण्यासाठी वापरणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मेणबत्ती, स्टोव्ह, 36 अमुल आणि गोकुळ दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि 294 लिटर भेसळ केलेले दूध जप्त करण्यात आले आहे.
बापलेकीच्या नात्याला काळीमा! ऑस्कर विजेत्याच्या मुलीनेच केले लैंगिक शोषणाचे आरोप
या प्रकरणी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.