Home /News /mumbai /

मंत्रालयात कामाच्या शिफ्टमध्ये होणार बदल, मुख्य सचिवांची महत्त्वाची सूचना

मंत्रालयात कामाच्या शिफ्टमध्ये होणार बदल, मुख्य सचिवांची महत्त्वाची सूचना

दोन दिवसांपूर्वीच मंत्रालयात महसूल विभागात 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं.

 मुंबई, 24 फेब्रुवारी : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्याचा गाडा हाकला जात असलेल्या मंत्रालयात (mantralaya) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे आता मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी  मुख्य सचिव यांनी सर्व सचिवांना सूचना केल्या आहे. मुख्य सचिव संजय कुमार यांनी सर्व सचिवांना एक सूचना प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे. आठवडा, प्रत्येकी 1 दिवस आड अथवा 3 दिवस अदलाबदली कर्मचारी काम करण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात सामाजिक सुरक्षा अंतर, कर्मचारी गर्दी होणार नाही, सॅनिटाझयर वापर याकडे लक्ष सचिवांनी द्यावे. असे आदेश मुख्य सचिव यांनी दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्रालयात महसूल विभागात 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तसंच महसूल विभागातच आणखी आठ ते नऊ लोकांना ताप, थंडी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आढळल्याची देखील माहिती समोर आली. प्रशासकीय आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ माजली असून पुढील काही दिवसात मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवेशाला देखील मर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. चार मंत्र्यांना कोरोनाची लागण विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक मंत्री आहेत. जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व मंत्री विलगीकरणामध्ये असून या सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Covid19, Mumbai

पुढील बातम्या